अमेरिकेने 1400 कर्मचारी सक्तीच्या रजेवर पाठवले

अमेरिकेत सध्या शटडाऊन सुरू आहे. याचा थेट परिणाम आता दिसू लागला आहे. अमेरिकेचे अण्वस्त्रे शस्त्रांवर देखरेख करणारी एजन्सी नॅशनल सिक्योरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एनएनएसए) ने 1400 कर्मचाऱ्यांना 1 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे, ही माहिती अमेरिकेचे ऊर्जामंत्री क्रिस राइट यांनी दिली. कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 30 दिवसांपर्यंत विनावेतन सुट्टी देण्यात येत आहे, असे या नोटिसीत म्हटले आहे. 400 कर्मचारी कामावर राहतील.