दिल्लीत प्रदूषणामुळे एक्यूआय 400 च्या पुढे

दिल्लीत दिवाळीत फटाके फोडल्याने प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे. दिल्लीतील एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) 400 च्या पुढे गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत केवळ हरित फटाके फोडण्याची परवानगी दिली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करत रात्रभर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे दिल्लीतील 38 पैकी 36 देखरेख केंद्रे ही रेडझोनमध्ये आलीत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, राजधानीतील हवेचा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) रात्री 10 वाजेपर्यंत 344 पेक्षा जास्त झाला आहे.