
हिंदुस्थानात धुमधडाक्यात दिवाळी उत्सव साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी एक्सवर पोस्ट करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज, यूएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉन्ग, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि संयुक्त राष्ट्रानेही एक्सवर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.