वेणू श्रीनिवासन बनले टाटा ट्रस्टचे आजीव ट्रस्टी!

अंतर्गत वादाची ठिणगी पडलेल्या टाटा ट्रस्टमध्ये वेणू श्रीनिवासन यांची ट्रस्टचे आजीव ट्रस्टी आणि उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते फेरनियुक्ती करण्यात आली आहे. श्रीनिवासन यांचा कार्यकाळ 23 ऑक्टोबरला संपणार होता. त्याआधी त्यांची फेरनियुक्ती करण्यास मंजुरी दिली गेली. त्यामुळे ट्रस्टचे विभाजन होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. आता मेहुल मिस्त्री यांना पुन्हा ट्रस्टी केले जाणार का, याकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे. त्यांचा आजीव ट्रस्टी पदावरील कार्यकाल आपोआप वाढणार, की सर्वांची संमती घ्यावी लागेल याबाबत मात्र वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत.