
सत्तेत आल्यास वक्फ कायदा कचराकुंडीत फेकून देऊ, असं वक्तव्य आरजेडी नेते आणि बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांनी केलं आहे. बिहारमधील कटिहार येथे निवडणूक सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले आहेत की, “माझे वडील लालूप्रसाद यादव यांनी कधीही जातीयवादी शक्तींशी तडजोड केली नाही. पण नितीश कुमार नेहमीच अशा शक्तींशी जुळवून घेत आले आहेत. त्यांच्यामुळेच संघ आणि त्यांच्या संघटना द्वेष पसरवत आहेत. भाजपला ‘भारत जलाओ पार्टी’ म्हटले पाहिजे.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत तेजस्वी यादव म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी अमित शहा बिहारमध्ये आले आणि त्यांनी आम्हाला निवडणूक लढू शकणार नाही, अशी अवस्था करू, अशी धमकी दिली. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही खरे बिहारी आहोत. एक बिहारी सब पे भारी.”
























































