
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात रविवारी 21 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. तसेच 18 शस्त्रे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. बस्तर रेंज पोलिसांनी सुरू केलेल्या ‘पूना मार्गेम: पुनर्वसनाद्वारे पुनर्मिलन’ उपक्रमांतर्गत माओवाद्यांनी शस्त्रे टाकली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
केशकल विभागाच्या (उत्तर उपक्षेत्रीय ब्युरो) कुएमारी/किस्कोडो क्षेत्र समितीचे एकूण 21 माओवाद्यांनी 18 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. 21 कार्यकर्त्यांपैकी 4 डीव्हीसीएम, 9 एसीएम आणि 8 पक्ष सदस्य मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. एकूण 13 महिला आणि 8 पुरुष सदस्यांचा समावेश आहे. माओवाद्यांनी तीन एके 47 रायफल्स, 4 एसएलआर रायफल्स, 2 आयएनएएसएएस रायफल्स, सहा .303 रायफल्स, 2 सिंगल शॉट रायफल्स आणि 1 बीजीएल शस्त्र सुपूर्द केले.
























































