हिवाळ्यात व्हिटॅमिन डी साठी दररोज किती अंडी खाणे गरजेचे आहे, वाचा

हिवाळ्यात आपल्या आहारात अंडी समाविष्ट करणे हे खूप गरजेचे असते. कारण हिवाळ्यात आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीची गरज ही फार मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन डी आपल्या शरीराच्या स्नायूंच्या प्रणालीमध्ये, हाडांच्या निर्मितीमध्ये आणि झीज दुरुस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मज्जासंस्थेच्या (मेंदू) सुरळीत कार्यासाठी आणि निरोगी रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी देखील व्हिटॅमिन डी आवश्यक आहे.

हिवाळ्यात अंजीर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे काय आहेत, वाचा

हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता जास्त असते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सांधेदुखी, अशक्तपणा, थकवा, केस गळणे आणि मूड स्विंग्स सारखी लक्षणे उद्भवू शकतात. हिवाळ्यात अंडी व्हिटॅमिन डीचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत.

अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे अ, ड, फोलेट, बी१२, बी२, फॉस्फरस, सेलेनियम, बी५, जीवनसत्त्वे ई, बी६, कॅल्शियम, प्रथिने, जस्त आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्ससारखे आवश्यक पोषक घटक असतात. अंड्यांमध्ये इतर अनेक पोषक घटक देखील असतात.

हिवाळ्यात काळे तीळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

दररोज किती अंडी खायला हवीत?

१४ ते १८ वर्षांच्या दरम्यान वय असेल तर १५ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डी ची आवश्यकता आहे. अशावेळी एक अंडे खाणे पुरेसे आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वयोगटातील लोक त्यांच्या वयानुसार त्यांच्या आहारात अंडी समाविष्ट करू शकतात. तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही तुमच्या आहारात दूध, चीज आणि दही सारखे दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करू शकता.