
पणन संचालक विकास रसाळ ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने या पदासाठी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, अपर निबंधक (पतसंस्था) डॉ. पी. एल. खंडागळे तसेच साखर संचालक यशवंत गिरी यांची नावे चर्चेत होती. अखेर या शर्यतीत संजय कदम यांनी बाजी मारली असून, त्यांची राज्याचे नवीन पणन संचालक म्हणून निवड झाली आहे.
राज्यातील सर्व बाजार समित्यांचे नियंत्रक म्हणून पणन संचालकाचे पद अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांमध्ये या पदासाठी नेहमीच स्पर्धा असते. सध्या कार्यरत असलेले संजय कदम हे तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण करून बदलीस पात्र झाले होते. त्यांनी सहकार–पणन क्षेत्रात विविध महत्वाच्या पदांवर काम केले असून, प्रशासनिक अनुभव लक्षात घेता त्यांचे नाव अढळ मानले जात होते. पणन विभागातील सर्वोच्च पदाची जबाबदारी आता संजय कदम यांच्या खांद्यावर आली असून, राज्यातील बाजार समित्यांचे प्रशासन, धोरणात्मक निर्णय आणि सुधारणा यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.































































