बीडमध्ये लक्ष्मीदर्शन… अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; धारदार शस्त्रही जप्त

राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. मतदानाचा हक्क बजावून लोक आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. लोकशाहीमध्ये निवडणूक निष्पक्ष होण्याची अपेक्षा असते, राज्यात अनेक ठिकाणी मतदानाच्या आदल्या रात्री लक्ष्मीदर्शन झाले. बीडमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्या पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून प्रचारादरम्यान मत द्या, विकासासाठी निधी देतो असा सर्रास प्रचार नगरपालिका निवडणुकीत करण्यात आला. मत दिले नाही तर विकासासाठी निधी मिळणार नाही अशी दमदाटी करण्यात आली. त्यातच 1 तारखेला रात्री बाहेरच खाटी टाकून झोपा, लक्ष्मी येणार आहे, असे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. मंत्र्यांनी केलेले विधान राज्याचा आर्थिक गाडा चालवणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरे ठरवले आणि बीडमध्ये मतदारांना पैसे वाटप सुरू केले. मात्र त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने खळबळ उडाली.

बीडमधील नाळवंडी नाका येथे मतदारांना पैसे देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. रात्री दहा वाजून 30 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली. सदर कार्यकर्त्यांच्या गाडीतून पैसे, धारदार शस्त्र आणि पक्षाची पत्रके जप्त करण्यात आली.

1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे! मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य