
चंद्रपूरात नगरपरिषदेचा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या एका मतदाराचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरलं होतं आहे. काल पार पडलेल्या गडचांदूर नगरपरिषदेचा निवडणुकीसाठी मतदार भीमराव गोविंदा डोंगरे आणि त्यांचा पत्नी गंगासागर हे मतदान केंद्रावर गेले होते. मात्र भीमराव डोंगरे व त्यांच्या पत्नी गंगासागर या दोघांच्याही नावाने आधीच कुणीतरी मतदान केल्याचे समजल्यानंतर त्यांना धक्का बसला.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आला आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. pic.twitter.com/NJkLIjaluK
— Saamana Online (@SaamanaOnline) December 3, 2025
त्यांनी याबाबत बुथवर जाब विचारला. त्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. निवडणूकी दरम्यान पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ गडचांदूर मधून पुढे आला होता. तसंच बटण कुठलीही दाबलं तरी कमळाला मत जात होतं असा धक्कादायक प्रकार देखील या ठिकाणी घडला होता. त्यानंतर एका तरुणाने evm मशीन फोडदेखील फोडली.

































































