
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन उद्यापासून हिंदुस्थानच्या दौऱयावर येत आहेत. ते उद्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. शुक्रवारी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. त्यानंतर संयुक्त निवेदन जारी केले जाईल. या दौऱयात रशिया व हिंदुस्थानमध्ये महत्त्वाचा संरक्षण करार होणार आहे.






























































