
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ‘बेस्ट’ कामगार सेना मुख्य कार्यकारिणी समिती 2025-2028 करिता निवडण्यात आली आहे. यानुसार ‘बेस्ट’ कामगार सेना ‘मुख्य कार्यकारिणी’मधील (कोअर कमिटी) पदाधिकारी आगारनिहाय विभागवार बैठका घेऊन ‘बेस्ट’ कामगार सेनेच्या सर्व आगाराच्या सर्व विभागाच्या डेपो सेव्रेटरी आणि आगार कार्यकारिणीला अंतिम स्वरूप देणार आहेत.
पुढील दहा दिवस ही प्रक्रिया पार पडल्यानंतर ‘बेस्ट’ कामगार सेना अध्यक्षांच्या उपस्थितीत कोअर कमिटीने निवडलेली ‘बेस्ट’ कामगार सेनेच्या संपूर्ण कार्यकारिणीत आवश्यक ते बदल करून सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात येईल. तोपर्यंत आज कार्यरत असलेले बेस्ट कामगार सेनेचे सर्व उपाध्यक्ष, चिटणीस, विभाग चिटणीस, आगार सचिव, आगार कार्यकारिणी आणि सेवानिवृत्त पदाधिकारी (मानद सदस्य) आपापल्या पदावर कार्यरत राहणार असल्याचे शिवसेना उपनेते अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले आहे.
‘बेस्ट’ कामगार सेना मुख्य कार्यकारिणी 2025 ते 2028 मध्ये अध्यक्षपदी सचिन अहिर, सरचिटणीसपदी नितीन नांदगावकर, प्रमुख मार्गदर्शक गौरीशंकर खोत आणि खजिनदारपदी भास्कर तोरस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वाहतूक विभाग उपाध्यक्षपदी महेश टुकरुल (संपूर्ण वाहतूक विभाग), राजू ससाणे (वाहतूक विभाग) सहायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारिणीमध्ये वाहतूक विभाग चिटणीस पदी (शहर) प्रशांत पवार, किरण राऊळ, वाहतूक विभाग (पश्चिम) – अविनाश हरयाण, आबाजी गावकर, वाहतूक विभाग (पूर्व) – अफझल शेख, दिनेश पुरी.
उपाध्यक्ष (अभियांत्रिकी विभाग): संपूर्ण अभियांत्रिकी विभाग – विलास विचारे. चिटणीस (अभियांत्रिकी विभाग) – अभियांत्रिकी विभाग (शहर) सुनील शिंदे, अभियांत्रिकी विभाग (पूर्व) – विनायक उपाध्ये, अभियांत्रिकी विभाग (पश्चिम) – औदुंबर बिडये. उपाध्यक्ष (विद्युत पुरवठा विभाग): संपूर्ण विद्युत पुरवठा विभाग – गणेश शिंदे. चिटणीस (विद्युत पुरवठा विभाग): विद्युत पुरवठा विभाग – राजेश खोत, दीपक जाधव.
उपाध्यक्ष (प्रशासकीय विभाग): युनियन व्यवस्थापकीय – उमेश सारंग, संपूर्ण उपाध्यक्ष प्रशासकीय व इतर विभाग – समीर हिंदळेकर,
चिटणीस (प्रशासकीय विभाग): संपूर्ण प्रशासकीय विभाग – समीर रेवंडकर, चिटणीस (सुरक्षा व दक्षता विभाग): संपूर्ण सुरक्षा विभाग – नितीन हातीम, संघटना समन्वयक (बेस्ट कामगार सेना): विद्युत पुरवठा विभाग – देवेंद्र कांबळे, कार्यालयः कार्यालय प्रमुख – अरविंद पावणोजी, सहकार्यालय प्रमुख – श्रीरंग कारंडे.


























































