संपूर्ण बांगलादेश हादरून जाईल…शरीफ ओसमान हादीला गोळ्या घालण्याआधी आरोपीचा प्रेयसीशी संवाद

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. हिंदुस्थान विरोधी नेता शरीफ ओसमान हादी याचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. प्रसार माध्यमांचे कार्यालय, सांस्कृतिक केंद्र, एवढेच नाही तर बांगलादेशचे संस्थापक शेख मुजुबूर रहमान यांच्या निवासस्थानालाही आंदोलकांनी आगीच्या हवाली केले. आंदोलकांनी एका हिंदू तरुणाचेही मॉब लिचिंग करत त्याला भर चौकात लटकवून पेटवून दिले. आता हादी यांच्या हत्येतील मुख्य आरोपीने गोळीबारापूर्वी प्रेयसीशी संवाद साधल्याचे समोर आले आहे.

गेल्या आठवड्यात 12 डिसेंबर रोजी ढाकामध्ये दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी हादीला गोळ्या घातल्या होत्या. या हल्ल्यातील मुख्य आरोपी फैसल करीम असून गोळीबाराच्या आदल्या रात्री त्याने प्रेयसीशी संवाद साधला होता. काहीतरी मोठे होणार असून यामुळे संपूर्ण बांग्लादेश हादरून जाईल, असे तो प्रेयसीला म्हणाला होता.

दरम्यान, गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या हादी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने मोहम्मद युनूस यांच्या सरकारने त्यांना तातडीने एअर अॅम्ब्यूलन्सने सिंगापूरला नेले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यानंतर बांग्लादेश पुन्हा पेटले.

‘माझा श्वास गुदमरतोय, तुम्ही मला मारून टाकताय!’ महिला पत्रकाराची पोस्ट; जळत्या कार्यालयातून ३० पत्रकारांची सुटका, अंगावर काटा आणणारा थरार