त्वचा मऊ मुलायम होण्यासाठी स्वस्त आणि मस्त केळ्याचा वापर करायलाच हवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केळ्याचा फेसपॅक हे वाचून थोडं आश्चर्य वाटेल, परंतु मऊ मुलायम त्वचेसाठी केळ्याचा फेसपॅक हा खूप परीणामकारक मानला जातो. सीझन कुठलाही असो बाजारामध्ये केळी सहजसुलभ उपलब्ध असतात. उन्हामुळे आणि बदलत्या हवामानामुळे चेहरा निस्तेज होतो. कधी कधी हा कोरडेपणा आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा इतका वाढतो की, दिवसातून कितीही वेळा चेहरा धुतला तरी चेहरा मऊ मुलायम होत नाही. अशावेळी घरी असलेली केळी यावर रामबाण उपाय आहे. घरामध्ये असलेल्या केळ्यांचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास, चेहरा मऊ मुलायम होतो.

केसांना अतिप्रमाणात कंडिशनर लावल्याने काय नुकसान होते

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी केळी फार गरजेची आहेत. म्हणूनच आठवड्यातून किमान एकदा तरी हा केळ्याचा फेस पॅक लावायलाच हवा.

केळी फेस पॅक

साहित्य:
अर्धी पिकलेली केळी
एक चमचा क्रीम
अर्धा चमचा मध

फळांचा रस की अख्खं फळ खायला हवं, आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय

अर्धी पिकलेली केळी घ्या. चमच्याने चांगले मॅश करा. क्रीम आणि मध घाला आणि सर्वकाही नीट मिसळा. ते क्रिमी होईपर्यंत मिसळा. ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हलके मॉइश्चरायझर लावा.

हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावता येतो. झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर फेस पॅक लावा. उत्तम परिणामांसाठी झोपण्यापूर्वी लावणे गरजेचे.