पांढरा की लाल? कोणता कांदा आपण खायला हवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या स्वयंपाकघरामध्ये कांद्याचे महत्त्व हे अबाधित आहे. बहुतांशी घरांमध्ये कांद्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. कांदा हा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे. बाजारात आपल्याला लाल आणि पांढरा असे दोन रंगाचे कांदे दिसतात. यापैकी आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम कांदा कोणता आणि तो कांदा खाण्याचे फायदे काय हे माहित असणेही गरजेचे आहे.

आयुर्वेदात कच्ची हळद औषधी का मानली जाते, जाणून घ्या

लाल कांदा- गुलाबी किंवा गडद लाल रंगाचा असतो. या कांद्याची चव थोडीशी तिखट असते. सॅलड, चाट, सँडविच आणि भाज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

पांढरा कांदा – हा पांढरा रंगाचा असतो आणि त्याची चव थोडी गोड असते. हा प्रामुख्याने ग्रेव्ही, बिर्याणी, करी आणि सूपमध्ये वापरले जाते कारण हा कांदा पचनास सुलभ असतो.

लाल कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगे असतात. तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते.

पांढऱ्या कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट्समध्ये थोडे जास्त असतात.

चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग नाहीसे करण्यासाठी फक्त एकच उपाय कडुलिंब

लाल कांद्याचे फायदे
हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर – त्यात आढळणारे अँटिऑक्सिडंट्स हृदय मजबूत करतात.
कर्करोग रोखण्यास मदत करते – लाल कांद्यामधील अँथोसायनिन्स कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करतात.
साखर नियंत्रित करण्यास मदत करते – त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे तो मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतो.

पांढऱ्या कांद्याचे फायदे
पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते निर्जलीकरण रोखते.

वजन कमी करण्यासाठी चवळी आहे सर्वात बेस्ट, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

कोणता कांदा अधिक फायदेशीर आहे?
आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, हृदय संरक्षण आणि अँटिऑक्सिडंट्सच्या बाबतीत विचार केला तर, लाल कांदे अधिक फायदेशीर मानले जातात कारण त्यात अधिक औषधी गुणधर्म असतात.

उन्हाळ्यात, पांढरे कांदा खाणे हे सर्वात उत्तम मानले जाते.

दोन्ही कांद्यांचे स्वतःचे फायदे आहेत, परंतु लाल कांदे आरोग्यासाठी अधिक शक्तिशाली आणि पौष्टिक मानले जातात, तर पांढरे कांदे चव आणि पचनासाठी चांगले असतात.

आयुर्वेदात पपईला अमृतफळ असे का म्हणतात