मंतरलेल्या शब्दबनात! विलेपार्ल्यात मंगळवारी कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या गीतांची मैफल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने मंगळवार, 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटयगृहात ’मंतरलेल्या शब्दबनात…जेव्हा कवितांची गाणी होतात’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या कवितांची स्वरमैफल या आगळ्यावेगळ्या सादरीकरणातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. गायक नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे, विद्या करलगीकर या मैफीलीला स्वरसाज देणार आहेत तर संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे असणार आहे.

ही काव्य-संगीत मैफल म्हणजे साहित्य आणि सुरांच्या संगमाचा अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असेल.22 मार्चपासून नाटयगृहावर प्रवेशिका उपलब्ध असतील, असे सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी सांगितले.