IPL 2026 – ऋषभ पंतची ‘नंबर 3’वर हाणामारी, आयपीएलसाठी लखनऊची रणनीती बदलणार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी आयपीएलसाठी लखनऊ सुपर जायंट्सचा (एलएसजी) कर्णधार ऋषभ पंत मोठा बदल करत मैदानात उतरणार आहे. 28 मार्चपासून सुरू होणाऱया स्पर्धेत पंत थेट तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करणार असून ही चाल एलएसजीच्या रणनीतीत मोठा टार्ंनग पॉइंट ठरणार आहे. 27 कोटींमध्ये विकत घेतलेल्या पंतसाठी मागील हंगाम निराशाजनक ठरला होता, पण यंदा तो जबरदस्त कमबॅकच्या इराद्याने सज्ज आहे.

पंतसाठी पूरन खाली

पंत तिसऱया क्रमांकावर आल्याने लखनऊच्या फलंदाजी क्रमात मोठा बदल होणार आहे. याचा थेट परिणाम निकोलस पूरनवर होणार असून त्याला खाली खेळावं लागेल. यंदा टॉप ऑर्डरमध्ये एडन मारक्रम, मिचेल मार्श आणि ऋषभ पंत अशी आक्रमक त्रिकूट दिसणार आहे. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि टीम मॅनेजमेंट पंतच्या या निर्णयावर पूर्ण सहमत आहेत. लखनऊ संघ सध्या घरच्या मैदानावर जोरदार सराव करत असून, 1 एप्रिलला दिल्ली पॅपिटल्सविरुद्ध पहिल्याच सामन्यात या नव्या रणनीतीची खरी परीक्षा लागणार आहे.

हिंदुस्थानी संघात पुनरागमनासाठी धडपड

पंतचा हा निर्णय फक्त आयपीएलपुरता मर्यादित नाही. त्याची नजर हिंदुस्थानच्या टी-20 संघात पुनरागमनावर आहे. सध्या तो फक्त कसोटी संघात स्थिर असून वन डेमध्ये के. एल. राहुलचा बॅकअप आहे. 2024 च्या विश्वचषकानंतर टी-20 संघातून बाहेर पडलेल्या पंतसमोर संजू सॅमसन आणि ईशान किशन यांचं तगडं आव्हान उभं आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल  त्याच्यासाठी ‘करो या मरो’ ठरणार आहे.