
शिवसेना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या स्थानिक खासदार विकास निधीतून काळाचौकी येथील एसटी बस थांब्याचे नूतनीकरण करण्यात आले. श्रावण यशवंते चौक येथील प्रसिद्ध कबड्डीपटू दिवंगत मधू पाटील यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या एसटी बस थांब्याचे आज लोकार्पण करण्यात आले.
प्रवाशांना व सर्वसामान्य जनतेला प्रवासादरम्यान हक्काची आणि सोयीसुविधांनी युक्त जागा मिळावी, या उद्देशाने निर्मिती करण्यात आलेल्या बस थांब्याचा लोकार्पण सोहळा खासदार अरविंद सावंत, मुंबई सेंट्रल बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे, एसटी वाहक मनोज माळूंजकर, चालक अमोल मोरे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी शिवसेनेचे भायखळा विधानसभा महिलाप्रमुख सुरेखा राऊत, महिला विधानसभा संघटक चंदना साळुंखे, महिला उपविभाग संघटक कीर्ती शिंदे, सहसंघटक रवींद्र चव्हाण, शाखाप्रमुख रमेश रावल आणि महिला शाखा संघटक अंजना औटी, नगरसेवक रमाकांत रहाटे तसेच महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, कार्यालय सचिव गंगाधर चंद्रमोरे, उत्तम सावंत, विनायक सैतवडकर आणि श्री सिद्धी गणेश सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश अपराध, खजिनदार नंदा राम पारखे, सदस्य सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.

























































