Photo – NDA च्या 150 व्या तुकडीचा शैक्षणिक पदवीप्रदान सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीच्या (एनडीए) 150 व्या ऐतिहासिक तुकडीचा शैक्षणिक पदवीप्रदान सोहळा एनडीएच्या हबीबुल्ला हॉलमध्ये उत्साहात पार पडला. पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल, माजी सनदी अधिकारी डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर एनडीएमधील ‘सुदान ब्लॉक’ आणि ‘सलारिया स्क्वेअर’ परिसरात ‘सारंग’ पथकाने आकर्षक रंगांनी सजलेल्या स्वदेशी हेलिकॉप्टर्ससह ‘फॉर्मेशन फ्लाइंग, हवाई अचुकता आणि कसबपूर्ण हवाई कसरतींची प्रत्यक्षिके सादर केली.

फोटो – चंद्रकांत पालकर