
2027 च्या आयसीसी वर्ल्ड कपसाठी के. एल. राहुल हा हिंदुस्थानचा प्रमुख यष्टिरक्षक असावा, असे मत इरफान पठाणने व्यक्त केले. राहुलच्या अनुभवासोबत ईशान किशनलाही संघात स्थान मिळावे, असे त्याने सांगितले. संधी मिळाल्यास संजू सॅमसनचाही विचार व्हायला हवा. कारण त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी राहिली आहे. राहुलने अलीकडच्या काळात फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.




























































