महाराष्ट्रातून मान्सून गायब? धडकी भरवणारे सॅटेलाईट फोटो आले समोर; सरासरी पर्जन्यमान घसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ सक्रिय झाल्यामुळे मुंबई, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भासह देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचे आगमन लांबलेले असतानाच आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुस्थानात दाखल झालेल्या मान्सूनचे सॅटेलाईटने घेतलेल्या फोटोमधून महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी धडकी भरवणारे आहेत. मान्सून जवळपास पश्चिमेकडील सर्व राज्यांमधून गायब झाल्याचे या फोटोंमधून दिसत आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमधून 14 जून रोजी देशातील महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भागह, ओडीशा, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू केरळचा अर्धा भाग या ठिकाणी मान्सून व्यवस्थितरित्या पसरलेला दिसत होता. मात्र 15 जूनच्या फोटोमध्ये मान्सून फक्त पंजाब व देशभरातील काही भागांमध्ये अगदी हलक्या स्वरुपात दिसत आहे. याचाच अर्थ संपूर्ण देशभरातून मान्सून गायब झाल्याचे दिसत आहे.