
खंबाळपाडा येथील केडीएमसीच्या कचरा डेपोमध्ये चक्क घंटागाडीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तो मृतदेह नेमका कुणाचा आहे आणि कचऱ्याच्या गाडीत कोणी टाकला याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्राrनगर रुग्णालयाकडे पाठवला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने प्राथमिक ओळख पटविणे कठीण झाले आहे.



























































