
बंगल्याच्या आवारातून चोरीला गेलेली आपली दुचाकी टेक्नोसॅव्ही शिक्षकाने स्वतःच शोधून काढली. प्रभात रस्त्यावरून चोरलेली ही दुचाकी बिबवेवाडी परिसरात सापडली.
याबाबत शिक्षकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रभात रस्त्यावर राहणारे हे तक्रारदार संगीत शिक्षक आहेत. रविवारी (दि. 1) पहाटे त्यांच्या बंगल्याच्या आवारातून चोरट्याने दुचाकी चोरून नेली. या दुचाकीला शिक्षकाने जीपीएस यंत्रणा बसवली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी दुचाकीचे लोकेशन शोधले. ही दुचाकी बिबवेवाडी येथे आढळून आली. त्यानंतर तेथे जाऊन त्यांनी दुचाकी ताब्यात घेतली. पोलीस कर्मचारी घाडगे तपास करीत आहेत.
































































