
सेनेगलनेच्या हबीब दियाराने चौथ्या मिनिटाला सेनेगलला आघाडी मिळवून दिली. 13 व्या मिनिटाला रेबिन सुलाकाला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवण्यात आल्याने इराकच्या अडचणी आणखी वाढल्या. पहिल्या सत्रामध्ये सेनेगलला केवळ एका गोलची आघाडी मिळाली असली होती; पण दुसऱया सत्रामध्ये त्यांनी गोलांचा वर्षाव केला. सेनेगलच्या इस्माईला सारने 56व्या मिनिटाला दुसरा गोल केला. त्यानंतर पापे गेयेने 59व्या आणि 71व्या मिनिटाला दोन शानदार गोल केले, तर 82व्या मिनिटाला इलिमान न्दियायेच्या पाचव्या गोलने इराकचा पराभव निश्चित केला. सेनेगलने 5-0 असा एकतर्फी विजय नोंदवला.



























































