
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी पोस्ट अपलोड करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथे ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.
नगवा गावचे रहिवासी विवेक कुमार पाठक यांनी या प्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, बलिया कोतवाली पोलीस ठाण्यात परमानंदपूर परिसरातील रहिवासी असलेल्या इर्शद अली या तरुणाविरुद्ध गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 67 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवरील या वादग्रस्त पोस्टमुळे भगवान श्री रामावर श्रद्धा असणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या भावना दुखावल्या जाण्याची, तसेच जातीय सलोखा बिघडवणे आणि द्वेष पसरवणे हा होता. पोलीस अधिक्षक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना पोलीस अधिक्षक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई सुरू आहे.

























































