
दुधावर जाड साय येणे हे केवळ दुधाच्या प्रकारावर अवलंबून नसते, तर दूध उकळण्याची योग्य पद्धत आणि काही छोटय़ा टिप्स केल्या की दुधावरील साय चपातीसारखी जाडी होईल.
म्हशीचे दूध वापरा किंवा फुल क्रीम दूध निवडा.
फॅटचे प्रमाण जितके जास्त, तितकी साय जाड होते. दूध उकळण्यासाठी रुंद आणि जाड बुडाचे भांडे वापरा.
दूध मंद आचेवर चांगले उकळू द्या. उकळताना सतत चमच्याने ढवळू नका. गरम दूध नैसर्गिकरीत्या थंड होऊ द्या. त्यामुळे साय व्यवस्थित तयार होते. त्यानंतरच दूध फ्रीजमध्ये ठेवा.






























































