घोडबंदर रोडवर शिवसेनेची मशालच धगधगणार, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही जण स्वतःचा धंदा सांभाळण्यासाठी आणि तसेच पोटापाण्याकरिता शिवसेना सोडून गेले आहेत. असे किती आले आणि गेले, पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मात्र भक्कमपणे टिकून आहे. तमाम शिवसैनिक त्यांच्या पाठीशी असून संघटनेची मशाल कायम धगधगत राहील, असा जबरदस्त विश्वास शिवसैनिक तसेच युवासैनिकांनी व्यक्त केला आहे.

 

घोडबंदर रोडवरील असंख्य तरुणांनी आज ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख व माजी महापौर नरेश मणेरा यांच्या पुढाकाराने शिवसेना-युवासेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे,
ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख व माजी महापौर नरेश मणेरा यांच्यासह ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे तसेच महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक अॅड. आकांक्षा राणे यांनी त्यांचे भगवा ध्वज हाती देऊन स्वागत केले. यावेळी या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आले.

 

शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा कितीही प्रयत्न केल तरी गेले ते स्वतःच्या पोटापाण्याचा धंदा सांभाळण्यासाठी. शिवसैनिक ठामपणे ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत. येणारा काळ हा आपलाच असेल, असा विश्वास शिवसेना नेते राजन विचारे आणि ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी व्यक्त केला.

 

ओवळा-माजीवडा विधानसभा युवाधिकारी मोक्षद मणेरा, सरचिटणीस निखिल गोंधळे, चिटणीस जीत मणेरा, निमेश भोया, मयूर पाटील, निरीक्षक राज मणेरा, शाखाप्रमुख राजेंद्र जोंधळे, नीलेश चव्हाण, उपशाखाप्रमुख उल्हास चिपकर, प्रकाश वरपे, शाखाप्रमुख रोहिदास मणेरा, उपशाखाप्रमुख सुनील मणेरा, प्रदीप पाटील, रॉकी डाकी, रोहितम डाकी यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहे.