
मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, कूपर तसेच शीव रुग्णालयामध्ये नवीन एमआरआय मशीन खरेदीची प्रक्रिया तसेच प्राथमिक उभारणी पूर्ण झाली असून ऑक्टोबर 2026पर्यंत ही एमआरआय यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. महापालिका रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रणा नादुरुस्त अवस्थेत असून त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे, असा मुद्दा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला होता. त्या लक्षवेधीला राज्यमंत्री मिसाळ यांनी उत्तर दिले.
























































