विद्यार्थ्याला 40 हजार व्याजासह परत करा! ग्राहक न्यायालयाचे खासगी हॉस्टेलला निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉस्टेलच्या नावाखाली एका विद्यार्थ्याकडून 35 हजार रुपये अॅडवॉन्स्ड घेतल्यानंतरही त्याला निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छतेचा आणि वारंवार विनंती करूनही वाय-फायचा पासवर्ड देण्यात न आल्याने या विद्यार्थ्याने अवघ्या सात दिवसांत हे खासगी हॉस्टेल सोडले, परंतु हॉस्टेलने अॅडवॉन्स्ड रक्कम देण्यास नकार दिला.

आर्यन रावत या विद्यार्थ्याने 17 ऑगस्ट 2023 रोजी ग्रेटर नोएडा येथील आयआयएलएम युनिव्हर्सिटीमध्ये बी.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. नालंदा लिविंग हॉस्टेलमध्ये एसी खोलीसाठी 35,000 रुपये अॅडव्हान्स भरले होते. हॉस्टेलमध्ये प्रवेश घेताना आर्यनला दर्जेदार जेवण, वाय-फाय आणि इतर सुविधांचे आश्वासन दिले होते, पण निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छतेचा आणि वारंवार विनंती करूनही वाय-फायचा पासवर्ड देण्यात आला नाही म्हणून आर्यनने अवघ्या सात दिवसांत म्हणजेच 23 ऑगस्ट 2023 रोजी हॉस्टेल सोडले. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने ग्रेटर नोएडा येथील एका नामांकित खासगी हॉस्टेलला विद्यार्थ्याची रक्कम 9 टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिलेत. तसेच विद्यार्थ्याला न्यायालयाचा खर्च यासाठी 10,000 रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. आर्यनचे सात दिवस हॉस्टेलमध्ये राहिल्याचे गृहीत धरून आयोगाने 5,000 रुपये वजा केले आहेत.