असं झालं तर… एसआयपीचे हप्ते वेळेवर न भरल्यास?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्या बँक खात्यातून दरमहा एका ठराविक तारखेला पूर्वनिश्चित रक्कम आपोआप कापली जाते आणि ती म्युच्युअल फंडात गुंतवली जाते.

त्या दिवशीच्या शेअर बाजारातील स्थितीनुसार तुमच्या कापल्या गेलेल्या रकमेचे म्युच्युअल फंड युनिट्स तुमच्या खात्यात जमा होतात.

एसआयपीचा हप्ता बँक खात्यात पुरेशा रकमेअभावी बाऊन्स झाला तर म्युच्युअल फंड कंपनीकडून दंड आकारला जात नाही, मात्र बँकेकडून बाऊन्स चार्ज लागू शकतो.

सलग तीन किंवा चार महिने हप्ते न भरल्यास तुमची एसआयपी योजना आपोआप रद्द होऊ शकते. एसआयपी थांबली किंवा रद्द झाली तरी आधी जमा केलेले पैसे बुडत नाहीत.

दरमहा 5,000 गुंतवले आणि सरासरी 12% परतावा मिळाला, तर 10 वर्षांत तब्बल 11 लाख 61 हजारांपेक्षा जास्त फंड उभा राहू शकतो.