FIFA World Cup 2026 – फ्रान्सला वर्ल्ड कपबाहेर काढण्याचा डाव; उपांत्यपूर्व सामन्यात सर्वच पंच अर्जेंटिनाचे, प्रशिक्षक डीडीएर यांचे मोठे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्स आणि अर्जेंटिना हे गेल्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळले होते. त्यानंतर या दोन्ही देशांतील स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. यावेळीही अर्जेंटिनाला सर्वात जास्त भीती ही फ्रान्सकडूनच वाटत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फ्रान्सला फायनलमध्ये पोहोचण्यापूर्वीच गारद करण्याची रणनीती आखली गेल्याचे आता म्हटले जात आहे. कारण फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील सामन्यामध्ये पाचही पंच अर्जेंटिनाचे असल्याचे आता समोर आले आहे. फ्रान्सचे प्रशिक्षक डीडीएर डेशचॅम्प्स यांनी मात्र पंचांबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या सामन्यासाठी मुख्य रेफ्रीसह सर्व सामना अधिकारी अर्जेंटिनामधून नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अजून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सर्व रेफ्री अर्जेंटिनामधून आहेत का?

फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी फॅपुंडो टेलो हे मुख्य रेफ्री असतील. सहाय्यक रेफ्री राखीव सहाय्यक आणि चौथे रेफरी यांच्यासह संपूर्ण पंचमंडळ अर्जेंटिनामधून आहे. परिणामी, या नियुक्तीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

फ्रेंच प्रशिक्षकांनी रेफ्रीबद्दल काय म्हटले?

सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत डेशचॅम्प्स यांनी स्पष्टपणे सांगितले की, आमच्या टीमचे लक्ष केवळ सामन्यावर पेंद्रित आहे. आम्हाला ही परिस्थिती स्वीकारावी लागेल. माझा पंचांवर पूर्ण विश्वास आहे. आमचा सामना मोरोक्कोविरुद्ध आहे, पंचांविरुद्ध नाही. आम्ही जशी मैदानात चांगली कामगिरी करतो तशीही पंचांनी करावी, एवढीच मला आशा आहे.