FIFA World Cup 2026 – वर्ल्ड कप राऊंड अप! गोल कोणत्या भाषेत ओरडायचा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेल्जियममध्ये डच बोलतात, फ्रेंच बोलतात, जर्मनही बोलतात. पण स्पेनविरुद्ध गोल झाला तर जल्लोष कोणत्या भाषेत करायचा? उत्तर सोपं आहे. आरडाओरड करायला भाषांतर लागत नाही. भाषिक विभागणी असलेल्या बेल्जियमला फुटबॉल एका लाल जर्सीत बांधतोय. लॉस एंजेलिसच्या बहुभाषिक वातावरणात ही कथा आणखी रंगलीय. स्पेनसमोर बेल्जियमचा एकच मंत्र असेल, भाषा नंतर ठरवू. आधी चेंडू जाळ्यात टापू.

हालांदच्या हातोडय़ाला इंग्लिश कुलूप?

फ्लोरिडाच्या कडक उन्हात नॉर्वे घाम गाळतोय, पण मायदेशात फुटबॉलचा ज्वर वाढलाय. कारण समोर इंग्लंड आणि हातात आर्ंलग हालांद नावाचा हातोडा. नॉर्वेला इतिहासाच्या दारावर टकटक करायची नाही, ते दार पह्डायचंय. इंग्लंडकडे परंपरा, प्रतिष्ठा आणि मोठी नावं आहेत, तर नॉर्वेकडे हालांदची भूक. त्यामुळे प्रश्न एकच आहे की इंग्लिश पुलूप मजबूत की नॉर्वेजियन हातोडा भारी?

स्विस घडय़ाळ विरुद्ध अर्जेंटाइन ज्वालामुखी

एका बाजूला स्वित्झर्लंडची शिस्त, अचूकता आणि घडय़ाळाच्या काटय़ासारखा खेळ; दुसरीकडे अर्जेंटिनाचा भावनिक ज्वालामुखी. कोलंबियाला पेनल्टीवर नमवून आलेल्या स्विस संघाच्या नसा मजबूत आहेत. पण आता समोर निळ्या-पांढऱ्या चाहत्यांचा महासागर. मियामीत प्रश्न फुटबॉलपेक्षा वेळेचा आहे, स्विस घडय़ाळ अचूक चालणार की अर्जेंटिनाचा ज्वालामुखी त्याचे काटेच वितळवणार?

अमेरिकेत आठ देशांची फुटबॉल संसद’!

उपांत्यपूर्व फेरीने अमेरिकेला आठ देशांची तात्पुरती संसद बनवलंय. फ्रेंच गाणी, मोरोक्कन ढोल, अर्जेंटिनाचा निळा-पांढरा महासागर, इंग्लिश घोषणा आणि नॉर्वेजियन जल्लोष यांच्यामुळे रस्तेच स्टेडियम झालेत