
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाल्यास नॉमिनीला तो फंड मिळू शकतो. नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारसदार दावा करू शकतात.
वारसदारांना मृत्यूचा दाखला, वारसा दाखला किंवा इच्छापत्र, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, म्युच्युअल फंड फोलिओ नंबर आणि इतर माहिती दावा दाखल करताना द्यावी लागते.
संबंधित म्युच्युअल फंड कंपनीला गुंतवणूक हस्तांतरीत करून घेण्यासाठी गुंतवणूकदाराच्या मृत्यूची माहिती द्यावी. त्यासोबत क्लेम फॉर्म सादर करावा लागतो.
जर गुंतवणूकदारानं नॉमिनीची निवड केली नसेल तर आवश्यक ती सर्व कागदपत्रे वारसांना सादर करावी लागतील. यासाठी वारसा प्रमाणपत्र किंवा गुंतवणूकदाराची इच्छापत्र आवश्यक आहे.
म्युच्युअल फंड कंपनी कागदपत्रांची तपासणी करून नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराकडे फंड हस्तांतरित करते. फंड हस्तांतरणावर कर आकारला जात नाही.

























































