
इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध भडकल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या होत्या. परंतु त्या आता सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. यामुळे तेल कंपन्यांना प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलमागे 11 रुपये नफा मिळत आहे. परंतु, युद्धाच्या नावाने इंधनाच्या वाढवलेल्या किमती अद्याप कमी करण्यात आल्या नाहीत. पेट्रोल-डिझेल स्वस्त कधी होणार, याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहे.
इंडियन बास्केटमधील कच्चे तेल 69.69 डॉलर बॅरलपर्यंत खाली आले आहे. युद्धावेळी हे 157 डॉलरच्या शिखरावर पोहोचले होते. सध्याच्या किमतीवर तेल कंपन्या पेट्रोलवर 10.5 रुपये आणि डिझेलवर 11 रुपये प्रति लिटरपर्यंत नफा कमावत आहेत. कच्च्या तेलाचे दर 1 जूनपासून 87 डॉलरच्या खाली आहेत. 2018 मध्ये कच्च्या तेलाचे दर 80.8 डॉलर बॅरल होते. तेव्हा दिल्लीत पेट्रोल 72.15 रुपये आणि डिझेल 70.21 रुपये प्रति लीटर होते. देशातील चार मोठय़ा तेल कंपन्यांचा नफा मागील वर्षी 2024-25 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 22 टक्क्यांपर्यंत जास्त राहिला आहे.
कंपनी 2025-26 2024-25
आयओसीएल 15,176 कोटी 8,398 कोटी
बीपीसीएल 3,214 कोटी 2,509 कोटी
एचपीसीएल 6060 कोटी 3,413 कोटी
एकूण 24,450 कोटी 14,320 कोटी


























































