
दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी येथे बालिकेशी गैरकृत्य प्रकरणी किशोर भगवानजी पटेल या 50 वर्षीय प्रौढावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, 7 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भोलेनाथ चा आधार हॉटेल एमआयडीसी वळणे येथे पीडित मुलगी व तिचा भाऊ हे दोघे हॉटेलमध्ये वडापाव आणण्यासाठी गेले होते. आरोपीने मुलग्याला पाणी आणण्यासाठी पाठवून मुली सोबत हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन अश्लील चाळे केले. याप्रकरणी किशोर पटेल मूळ राहणार देवपूर नखत राणा जिल्हा भुज गुजरात सध्या एमआयडीसी वळणे याच्यावर भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 64 (1), 64 (2),(l), 65 (2) पोक्सो 4 (2), 8,10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ करीत आहेत.



























































