एकाचवेळी 35 क्षेपणास्त्र डागली, घर बेचिराख झालं; खामेनींचा मृत्यू झाला ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं, 132 दिवसानंतर Video आला समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा युद्धाची सुरुवात झाली आहे. शांतता करारानंतरही दोन्ही देश आमनेसामने आलेले असतानाच इराण सरकारने बुधवारी रात्री उशिरा पहिल्यांदाच आपले दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा अधिकृत व्हिडीओ जारी केला आहे. विशेष म्हणजे खामेनी यांच्या पार्थिवावर आज 9 जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहे, त्याआधीच हा व्हिडीओ जारी करण्यात आला. तर दुसरीकडे अमेरिकेनेही याचवेळी इराणवर भीषण हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे आखातात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत.

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या तेहरानमधील मुख्य निवासस्थानाच्या विद्ध्वंसाचे पहिले अधिकृत फुटेज इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त क्षेपणास्त्र हल्ल्यात 86 वर्षीय खमेनेई यांचा मृत्यू झाला होता. अमेरिका-इस्रायलने एकाचवेळी 35 क्षेपणास्त्र डागली होती. या भीषण हल्ल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाची काय अवस्था झाली होती याची पहिली झलक या 35 सेकंदांच्या व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आली आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तेहरानमधील इमाम खोमेनी हुसैनिया या मुख्य सभागृहाची झालेली दुरवस्था स्पष्टपणे दिसत आहे. याच हॉलमध्ये खामेनी देशातील आणि परदेशातील महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका घेत असत, तसेच जनतेला संबोधित करत असत. व्हिडिओमध्ये इमारतीचे कोसळलेले छत, वाकलेले लोखंडी खांब आणि सिमेट-कॉक्रीटचे मोठे ढीग दिसत आहेत. यावरून अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याची तीव्रता किती भयंकर होती याचा अंदाज येतो.

कुटुंबीयांचाही मृत्यू

इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धाच्या पहिल्याच दिवशी हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या 14 महिन्यांच्या नातीचा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचाही मृत्यू झाला होता. खामेनी यांचे पुत्र मोजताबा अली खामेनी हे या हल्ल्यात जखमी झाले होते. तेच आता इराणचे सर्वोच्च नेते आहेत.

Iran US War – युद्ध पुन्हा भडकले; अमेरिकेचा इराणचा चाबहार बंदरावर क्षेपणास्त्र हल्ला, हिंदुस्थानशी थेट संबंध

पाच शहरांमधून निघाली अंत्ययात्रा

दरम्यान, खामेनी यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मशहाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून त्यांची अंत्ययात्रा सुरू होती. त्यांचे पार्थिव तेहरानच्या ग्रँड मोसल्ला येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर इराणमधील तेहरान आणि कोम, तसेच शेजारील देश इराक मधील शिया धर्मियांची पवित्र शहरे असलेल्या नजफ आणि कर्बला येथे त्यांचे पार्थिव नेण्यात आले होते. या ठिकाणी लाखो भाविकांनी आणि नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.