
तीर्थयाञेला निघालेल्या भाविकांच्या क्रूझर आणि ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अन्य तीन जण जखमी झाले. कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा तालुक्यात बुधवारी राञी ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण स्विगीमध्ये काम करत होते, माञ याञेला जाताना वाटेतच काळाने गाठले. येल्लापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, क्रूझर गाडी धारवाडहून अंकोलाकडे चालली होती. गाडीत 9 जण होते. सर्वजण धर्मस्थला आणि चिकमगलूर येथे याञेला चालले होते. माञ अरबैल घाटजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने क्रूझरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझरमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी येल्लापूर सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.

























































