
जनशक्ती जनता दलचे (जेजेडी) राष्ट्रीय अध्यक्ष तेजप्रताप यादव यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बिहारमधील सरकार लवकरच कोसळणार असल्याचे तेजप्रताप यांनी म्हटले आहे. बांकीपूरचे भाजप उमेदवार अभिषेक सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर तेजप्रताप यांनी हा दावा केला आहे.
शुक्रवारी तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या X हँडलवर पोस्ट करत लिहिले की, “बिहारमध्ये खूप लवकर सरकार कोसळणार आहे, आणि नितीश कुमार यांनी सम्राट म्हणत मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितले होते, भविष्यवाणी केली होती. मी आता वृंदावनमध्ये आहे, खूप लवकर बिहारमधील सध्याचे सरकार बदलेल.”
बिहार में बहुत जल्दी सरकार गिरने वाली है, और नीतीश कुमार ने सम्राट कहकर मुख्यमंत्री को फटकार लगाया है. ये मैंने आपको कहा था, भविष्यवाणी किया था. और मैं वृंदावन में हूँ, बहुत जल्दी बिहार में जो सरकार है, बदल जाएगी. pic.twitter.com/JCDB8UowP6
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) July 10, 2026




























































