
मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाची लक्तरे दररोज निघत असताना केंद्र व राज्य सरकार, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि ठेकेदार निद्रिस्त बसले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील काम सुरू असलेल्या पुलाच्या संरक्षक भिंतीचे स्लॅब पाहून कुणी ओरबाडले की कुरतडले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच लांजा येथील अपूर्ण पुलाचे स्लॅब निसटले होते. यावरून मुंबई-गोवा महामार्ग किती सुरक्षित आहे? यावर सवाल उपस्थित होत आहेत.
निवळी येथील पुलाचे काम रखडले आहे.पुलाच्या संरक्षक भिंतीचे स्लॅब ढासळत आहे. पुल पूर्ण होण्याआधीच ही अवस्था निर्माण झाल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुलाच्या कामामुळे अनेक वर्ष वाहनचालकांना त्रास भोगावा लागत होता आता हे ढासळणारे स्लॅब पाहून अनेकांच्या मनात भीती निर्माण होत आहे.





























































