असं झालं तर… मुदत संपण्यापूर्वी एफडीमधून पैसे काढल्यास?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांगली बचत करण्यासाठी बँक एफडी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. एफडीत गुंतवणूक करताना सर्वप्रथम त्याचा कार्यकाळ विचारात घेणे आवश्यक आहे.

मुदत संपण्यापूर्वी एफडीमधून पैसे काढल्यास 1 टक्केपर्यंत दंड भरावा लागतो. ज्यामुळे ठेवींवर मिळणारे एकूण व्याज कमी होते.

बऱयाच बँका प्री-मॅच्युअर विड्रॉलवर 0.5% ते 1.5% पर्यंत दंड आकारतात. एफडी केल्यापासून 7 दिवसांच्या आत पैसे काढले, तर कोणतेही व्याज मिळत नाही.

टॅक्स सेव्हर एफडीमध्ये 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. मुदत संपण्यापूर्वी पैसे काढता येत नाहीत. एफडी मोडण्याऐवजी ‘ओव्हरड्राफ्ट’ किंवा ‘स्वीप-इन’ सुविधा घेऊ शकता.

एफडी मोडताना होणारे नुकसान आणि दंड प्रत्येक बँकेच्या नियमांनुसार वेगवेगळा असू शकतो? अधिक अचूक माहितीसाठी तुम्ही तुमच्या बँक शाखेला भेट द्या.