
पावसाळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पालिकेची उद्या विशेष बैठक होणार आहे. मुंबईत अलीकडेच झाड आणि मॅनहोलच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये चार मुंबईकरांचे प्राण गेले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि उपाययोजना यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
शुक्रवार, 10 जुलै रोजीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी आज गटनेत्यांची बैठक घेतली. विशेष बैठकीत केवळ गटनेत्यांनी बोलावे किंवा सदस्यांनी ठराविक तास बोलावे, अशी सत्ताधाऱयांची सूचना होती. त्यावर शिवसेनेने हरकत घेतली आहे. ही प्रत्येक वॉर्डातील समस्या असून सर्वांना आपले मत मांडू द्यावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी केली.





























































