आदेश बांदेकरांसोबत अनुभवा वारी पंढरीची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढीची वारी सुरू झाली आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर आहेत, मात्र इच्छा असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक विठ्ठलभक्तांना पंढरीची वाट चालता येत नाही. अशा लोकांना घरबसल्या पंढरीची वारी अनुभवण्याची संधी मिळणार आहे, तीही अभिनेते, सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्यासोबत. ‘आदेश विश्व’ या यूट्यूब चॅनेलवर रोज सायंकाळी साडेसहा वाजता ‘वारी पंढरीची’ हा कार्यक्रम होणार आहे. आदेश बांदेकर हे स्वतः कुटुंबासह पंढरीची वाट चालत आहेत. त्यांची ही वारी सर्वांना मोबाइल किंवा टीव्हीवर लाइव्ह पाहता येणार असून ते वारीच्या प्रत्येक क्षणाची माहिती देणार आहेत.