रेल्वेच्या डब्याला बनवले हनिमून सूट! टीसी निलंबित; डेकोरेटरवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मधील फर्स्ट एसी कोच सजवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दाखल घेत डब्यातील टीसीला निलंबित करण्यात आले असून डबा सजवणाऱ्या डेकोरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये रेल्वेचा डबा एखाद्या ‘हनिमून सूट’सारखा गुलाबाच्या फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेला दिसत आहे. 6 जुलै रोजीच्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मध्ये हा  प्रकार घडला. नवविवाहित जोडप्याने त्यांचा रेल्वे प्रवास खास बनवण्यासाठी फर्स्ट एसी कोचची सजावट करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी ‘राहत रूम डेकोरेशन’ या खासगी डेकोरेटरला ऑनलाइन बुक केले होते. डेकोरेटरने अनधिपृतपणे प्रवेश करत संपूर्ण कोच लाल-पांढरे फुगे, हृदयाच्या आकाराचे शोभेचे साहित्य, गुलाबाच्या पाकळ्या आणि अप्पर बर्थवर ‘आय लव्ह यू’ असा संदेश लावून सजवला होता.

रेल्वेची तत्काळ कारवाई

डेकोरेटरचा कोचमधील प्रवेश पूर्णपणे अनधिपृत असून ही एक अत्यंत गंभीर सुरक्षा त्रुटी आहे. या हलगर्जीपणाबद्दल डय़ुटीवर असलेले मुख्य तिकीट निरीक्षक गिरीश पुमार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून त्यांची सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित डेकोरेटरवर रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.