
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (महाज्योती) मार्गदर्शनातून यूपीएससीमध्ये 110, एमपीएससीमध्ये 371 तसेच लष्कर, पोलीस भरती, बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये 2,030 उमेदवारांनी यश संपादन केले आहे. ‘महाज्योती’ला आतापर्यंत 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून अतिरिक्त 150 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आज इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात भाजप आमदार उमा खापरे, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता.





























































