
आरोग्याला हानिकारक ठरू शकणार्या पाकिस्तानी उत्पादनांवर अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. काल रात्री एका दुकानावर छापा टाकून एफडीए आणि पोलिसांनी ३८ प्रकाराचे भारतात प्रतिबंधित असलेले पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने असा ३९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुरुवारी रात्री नांदेड शहरातील मन्यार गल्ली येथे ही कारवाई करण्यात आली असून, यासंदर्भात मौहम्मद जियाओद्दीन मौहम्मद वाजीद (२५) रा.मनियार गल्ली इतवारा नांदेड याच्याविरुध्द त्यास अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे दुकान मालक हा टूर्स एन्ड ट्रॅव्हल्स व्यवसायाच्या आडमध्ये हा गोरखधंदा करत होता, अशी माहिती देखील समोर येत आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ३९ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरातील मन्यार गल्ली येथील अप्रâा जनरल स्टोअर्स दुकानात पाकिस्तानी उत्पादन असलेले सौदर्याचे साधने विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती इतवारा पोलिसांना मिळाली. गुरुवारी रात्री पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी अशोक राठोड सोबत घेऊन दुकानात आणि गोदामात छापा टाकला. छाप्यात भारतात विक्रीसाठी पूर्णपणे बंदी असलेली तब्बल ३७ ते ३८ प्रकारची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या या मालाची किंमत तब्बल ३९ लाख ६० हजार रुपये एवढी आहे.
दरम्यान जप्त करण्यात आलेल्या या सौंदर्य प्रसाधनांमध्ये नेमके कोणते घातक रासायनिक घटक मिसळले गेले आहेत, जे मानवी त्वचेला आणि आरोग्याला हानी पोहोचवू शकतात, याची तपासणी केली जाणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने या उत्पादनांचे विविध नमुने गोळा करून ते पुढील तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती एफडीए विभागाचे अधिकारी अशोक राठोड यांनी दिली. दरम्यान या खळबळजनक कारवाईनंतर पोलिसांनी संबंधित दुकानाच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. भारतात पूर्णपणे बंदी असलेला हा पाकिस्तानी उत्पादनांचा एवढा मोठा साठा नांदेडमध्ये कसा आणि कोठून आणण्यात आला? या बेकायदेशीर रॅकेटच्या मागे आणखी कोणाकोणाचे हात आहेत? आणि हा माल पुढे कोणाकोणाला पुरवला जाणार होता? या सर्व बाजूंचा इतवारा पोलीस आणि प्रशासन अत्यंत सखोलपणे तपास करत आहेत. या कारवाईमुळे शहरात बंदी असलेल्या आणि आरोग्याला घातक उत्पादनांची विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.





























































