
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बीड जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या मार्फत नेमणूक करण्यात आलेल्या 396 बुथप्रमुखांना विमा पॉलिसी व ओळखपत्राचे वाटप आज शिवसेनाभवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.




























































