
जास्वंदीचं झाड निरोगी असूनही त्याला फुलं कमी येत असतील, तर झाडाला योग्य पोषण मिळतंय का, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
केवळ पाणी देणं पुरेसं नसतं. झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश, योग्य पाणी, चांगली माती आणि आवश्यक पोषक घटक मिळणं महत्त्वाचं असतं.
जास्वंदीच्या झाडासाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म पोषक घटक महत्त्वाचे असतात. या सर्वांचे मिश्रण करा आणि झाडांना द्या.

























































