
घरगुती वादातून चाकूने गळ्यावर वार करत पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील आग्रीपाडा परिसरात घडली. जन्नत एहसान शेख असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी एहसान शेख (19) आणि त्याची पत्नी जन्नत दोघेही रोजंदारीवर काम करत होते. दोघांमध्ये घरगुती वाद झाला. या वादातून एहसानने शुक्रवारी पहाटे जन्नतच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याच चाकूने स्वतःवर वार करून जीवन संपवले. जन्नत गंभीर जखमी अवस्थेत नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.




























































