
सप्टेंबर महिना सुरू झाला अद्यापही मराठवाड्यामध्ये पाऊस नाही. जलसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत आहे. अनियमित पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.




























































