छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना यांनी मांडली होती. त्यावर मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार येईल.